शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतो
पाणी शरीरातील विषारी घटक मूत्राद्वारे बाहेर टाकण्याचे काम करते. यामुळे त्वचा स्वच्छ राहते आणि आतून शरीर निरोगी बनते.
वजन कमी करण्यास मदत
जे लोक वजन कमी करू पाहतात त्यांनी भरपूर पाणी प्यायला हवे. पाणी पिल्यामुळे भूक कमी होते आणि चयापचय सुधारतो.
त्वचा होते चमकदार
पाणी त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवते आणि कोरडेपणा, सुरकुत्या दूर ठेवते. नियमित पाणी पिल्याने त्वचा स्वच्छ आणि ग्लोइंग दिसते.
डोकेदुखी आणि थकवा कमी होतो
पाण्याची कमतरता ही डोकेदुखीचं एक प्रमुख कारण असू शकते. दिवसभर थकवा जाणवत असल्यास, एक ग्लास थंड पाणी प्या – फरक जाणवेल.
पचनक्रिया सुधारतो
पाणी पिण्यामुळे अन्न सहज पचते, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचनक्रिया बळकट होते.
रोज किती पाणी प्यावं
साधारणतः एका प्रौढ व्यक्तीने दिवसाला २.५ ते ३ लिटर पाणी प्यावे. उन्हाळ्यात, व्यायाम करताना